निखिल जोशी - लेख सूची

तंत्रज्ञानाचा समाजावरील परिणाम

हल्ली मुले स्मार्टफोनला चिकटून असतात म्हणून जे पालक चिंतित असतात त्यांच्या पालकांना तीसेक वर्षांपूर्वी टीव्हीचीही तशीच भीती वाटत होती. त्याआधीच्या पिढीतील तरुण मुले रेडिओमुळे बिघडतील अशीही भीती त्यांच्या पालकांनी व्यक्त केली होती. तंत्रज्ञानाविषयी लोकांची प्रतिक्रिया कशी बदलते त्याविषयी प्रतिभावंत विज्ञानकथालेखक डग्लस अ‍ॅडम्स यांनी सांगितलेल्या ठोकताळ्यांचा स्वैर अनुवाद काहीसा असा करता येईल: “तुमच्या बालपणापासून प्रचलित असलेले …

प्रसन्न जोशी ह्यांच्या सूचनांबद्दल आयोजकांची मते व खुलासे

१. पारलौकिक संदर्भ असलेल्या ‘शुभेच्छा’, ‘दुर्दैव’, इ. शब्दांच्या आणि रूढींच्या सयुक्तिकतेविषयी जोशी यांनी विनोद केले. परंतु, गांभीर्याने पाहिले तर अनेक शब्दांचे आणि रूढींचे अर्थ कालौघात बदललेले आहेत. समाजावर पारलौकिक धारणांचा पगडा होता तेव्हा भाषेत आणि संस्कृतीत त्यांचे प्रतिबिंब दिसणारच. पुत्र या शब्दाची व्युत्पत्ती ‘पुत्’-नरकातून वाचवणारा अशी आहे. Mundane या शब्दाचा मूळ अर्थ ‘ऐहिक’ असा आहे. …

नैनान् विसंगतयः छिन्दति कुंभोजकर

पुणे येथे १८ डिसेंबर २०२२ ला ‘ब्राईट्स सोसायटी’तर्फे आयोजित नास्तिक परिषदेच्या निमित्ताने हरिहर कुंभोजकर यांनी लिहिलेल्या लेखावर मी दिलेल्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया म्हणून लेख लिहिल्याबद्दल कुंभोजकरांचे आभार. मी कुंभोजकरांचे किंवा कुंभोजकर माझे मतपरिवर्तन करू शकतील अशी फारशी आशा माझ्या मनात नाही. त्यामुळे, ‘आजचा सुधारक’च्या वाचकांचे मतपरिवर्तन करणे (किंवा, जे आधीच आपल्या विचारांशी अनुकूल आहेत त्यांचे मत …

कुंभोजकरांच्या लेखातील काही विसंगती

कुंभोजकरांचा गणिताचा अभ्यास असल्यामुळे त्यांना हे तर माहितीच असेल की एकदा १=२ सिद्ध केले की सिद्धतेच्या इतर पायर्‍यांमध्ये काहीही चूक न करताही कोणताही चुकीचा निष्कर्ष मांडता येतो. त्याच धर्तीवर, त्यांच्या लेखात काही पायर्‍यांमध्ये चुका आहेत, बाकीच्या फाफटपसार्‍याची दखल न घेता चुकीचे दावे पाहू. हे दावे अडवून धरले की बाकीचा साराच डोलारा कोसळतो. “तो स्वतःलाच परमेश्वर …

बुद्धिप्रामाण्यावर संक्रांत

(२०१६ साली जलिकट्टू शर्यतींवर बंदी आली होती. त्या विषयावरील निखिल जोशी यांचा लेख ‘बिगुल’ ह्या मराठी ऑनलाईल पोर्टलवर जानेवारी २०१७ सालीं प्रकाशित झाला होता. महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठविली असल्याच्या पार्श्वभूमीवर ह्या लेखाचे औचित्य वाटल्याने हा लेख येथे प्रसिद्ध करीत आहोत.) गेल्यावर्षी दहीहंडीवर न्यायालयाने निर्बंध घातले होते. लहान मुलांना धोकादायक परिस्थितीत टाकण्याविरुद्ध आणि सार्वजनिक जागा व्यापून …

फलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता

फलज्योतिषाविरुद्धचे नव्याने शोधले गेले आहेत असे फारसे युक्तिवाद माझ्या माहितीत नाहीत. भारतात अनेक समाजसुधारकांनी, नेत्यांनी, विद्वानांनी फलज्योतिषाविरुद्धचे बहुतेक युक्तिवाद एकोणिसाव्या शतकापासूनच मांडलेले आहेत. आणि तरीही लोकांचा फलज्योतिषावरील विश्वास घटल्याचे जाणवत नाही. ही अंधश्रद्धा केवळ भारतातच रुजली आहे असे नाही, जगभरातच यशस्वी अंधश्रद्धांपैकी फलज्योतिष ही एक महत्त्वाची अंधश्रद्धा आहे. राजकीय प्रतलावरही या विषयात आपल्याला फारसे डावे-उजवे करता येत नाही. फलज्योतिषाला पाठिंबा देणे …

भावनेला शास्त्रकाट्यावर तोलण्याची गरज

‘भारतीय दंड विधाना’च्या (Indian Penal Code) कलम 295A नुसार, ‘मुद्दामहून धार्मिक भावना दुखविण्यासाठी कोणत्याही गटाच्या धर्मश्रद्धेचा अपमान करणे’ हा गुन्हा आहे. तसेच, कलम 298 नुसार, ‘मुद्दामहून कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखविण्यासाठी अभिव्यक्त होणे’ हा गुन्हा आहे. देवाचा अपमान करणार्‍या कृतीमुळे/वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखाविल्या जाऊ शकतात, त्यामुळे ह्या कलमांना ईशनिंदा-बंदी (anti-blasphemy laws) असेही म्हणतात. ही कलमे …

आरोग्य आणि अंधश्रद्धा

आपण प्रत्येक घटनेचे कारण शोधतो. नको असलेल्या घटना टाळून हव्या असलेल्या घटना वारंवार घडविण्यासाठी ती पहिली पायरी आहे. घटनेच्या कारणशृंखलेतील आपल्या कुवतीचे दुवे शोधून त्यांवर नियंत्रण करण्याची आपली इच्छा असते. हे वर्णन विज्ञानाचे असले तरी उत्क्रांतीमुळे ते आपल्या स्वभावातच मुरले आहे. अर्थात, उत्क्रांतीने मिळालेल्या इतर गुणांप्रमाणेच, कारण शोधण्याची कलासुद्धा अगदी प्राथमिक आहे. कुत्र्यांना अन्न देण्याच्या …

आयुर्वेदाच्या मर्यादा

होमिओपॅथीचे बिंग फोडल्याबद्दल लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिकाचे आभार. परंतु अशीच काहीशी परिस्थिती आयुर्वेदाची आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगातील ८०% लोक रोगप्रतिबंधासाठी वैकल्पिक उपचारपद्धती वापरतात. त्यांपैकी आयुर्वेद एक महत्त्वाची उपचारशाखा असल्यामुळे या विषयाला विशेष महत्त्व आहे. सामाजिक आरोग्याच्या विषयावर प्रबोधन करणे हे डॉक्टरांचे कर्तव्यच असल्यामुळे हा लेखनप्रपंच केला आहे. आमच्या ज्ञानशाखेला ‘ॲलोपॅथी’ असे चुकीचे …